मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याच्या भीतीतूनच नार्वेकरांचे ट्विट

मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याच्या भीतीतूनच नार्वेकरांचे ट्विट

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करून बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेत बळी गेलेल्या शिवसैनिकांना ६ डिसेंबरच्या निमित्ताने नमन केले आहे. मात्र शिवसेनेचा हा ढोंगीपणा असून मराठी, हिंदुत्ववादी मतदार दुरावल्यामुळे भीतीपोटी हे ट्विट केल्याचा हल्लाबोल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

आमदार भातखळकर म्हणाले की, शिवसेनेच्या ढोंगीपणाचा हा उत्तम नमुना आहे. मिलिंद्र नार्वेकरांच्या ट्विटला काडीचेही महत्त्व नाही. बाबरी ढाचा ढळला तो कारसेवक, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेने जे जनआंदोलन उभारले त्यामुळे. पण शिवसेनेला हे ठाऊक आहे की आपण हिंदुत्व सोडलेले आहे, मराठीचा मुद्दा सोडलेला आहे. त्यामुळे मराठी, हिंदुत्ववादी मतदार आपल्यापासून दुरावला आहे, त्या भीतीपोटी ही दुहेरी नीती ते घेतात त्यातला हा नमुना आहे.

आ. भातखळकर यांनी सांगितले की, मी नार्वेकरांना आणि शिवसेनेला एवढेच सांगेन की, तुमच्या या ढोंगी हिंदुत्वाला महाराष्ट्राची मुंबईची जनता भुलणार नाही. तुमचे खरे स्वरूप हेच आहे की, सत्तेसाठी तुम्ही सोनियांसमोर लोटांगण घातलेत. ज्या सोनिया गांधींचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने करायचे ती भाषा मी वापरू शकत नाही,  पण अशा सोनियांसमोर तुम्ही नतमस्तक होता. ममता बॅनर्जींनी हॉटेलला भेटायला बोलावल्यावर त्यांना भेटायला जाता, ज्या ममता बॅनर्जींनी सीएएला, दुर्गापुजेला विरोध केला त्यांच्यासमोर नतमस्तक होता. आज मात्र ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांना मी शत शत नमन करतो. शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी बाणा सत्तेसाठी सोडला आहे ही वस्तुस्थिती आहे.

हे ही वाचा:

विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट

चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!

शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्षांनी स्वीकारला हिंदू धर्म…वाचा सविस्तर

वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली

 

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत बाबरी पतनप्रकरणी बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना नमन केले आहे. त्यावरून टीकेचा सूर उमटला आहे. ६ डिसेंबर या दिवशीच बाबरीचा ढाचा पाडला गेला होता. आता त्याच अयोध्येत श्री राम मंदिर उभे राहात आहे.

Exit mobile version