तुमचेच सरकार, तुमचाच गृहमंत्री तरी कुणीतरी पाळत कसे ठेवतो?

तुमचेच सरकार, तुमचाच गृहमंत्री तरी कुणीतरी पाळत कसे ठेवतो?

माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, मला वाटते नवाब मलिक रोज सकाळी हर्बल तंबाखू घेऊन बोलतात यावर शिक्कामोर्तब झाले. ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचे गृहमंत्री आहेत, त्यांचे सरकार आहेत,  त्यांचे पोलिस आहेत, त्यांच्या गुप्तचर यंत्रणा आहेत, तरी ते म्हणतात की, त्यांच्यावर पाळत ठेवली जाते? बरं जरी पाळत ठेवली जाते असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार केली पाहिजे. त्याऐवजी पत्रकार परिषद घेऊन ते सगळं सांगतात.

क्षणभर आपण हे गृहित धरू की त्यांच्यावर पाळत ठेवली जाते, मग त्या लोकांना त्यांनी सावध केले आहे. तुम्ही पाळत ठेवताय आता तुम्ही दूर व्हा, असेच त्यांना म्हणायचे आहे. ही सगळी नौटंकी, ढोंगीपणा आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करायचे. कोरोनाचा मुद्दा असेल, पेट्रोल डिझेलवरील कर कमी न करण्याचा मुद्दा असेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर मुद्दा असेल. हे सगळे बाजुला सारून रोज नवा भलताच खोटा अजेंडा सेट करायचा, त्यातला हा नवा उद्योग आहे. त्यामुळे मंत्रीच जर म्हणतो की माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवतोय तर त्यांच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. हे हर्बल तंबाखू घेऊन बोलत आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा:

माजी सहकाऱ्यानेच केली इघे यांची हत्या

पोलीस आयुक्त नगराळेंची पत्नी पोटगीपासून वंचित

वानखेडे मैदानातील कसोटीला असणार केवळ २५% प्रेक्षक

नवा व्हेरियंट, नवी नियमावली

 

नवाब मलिका यांनी अनिल देशमुखांप्रमाणे आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही म्हटले होते, त्यावर आमदार भातखळकर म्हणतात की, अनिल देशमुखांवर आरोप झाले ते सचिन वाझेकडून. त्याला त्यांनीच प्रथम सेवेत घेतले होते. त्यामुळे हे आरोप निलाजरेपणा आहे. उच्च न्यायालयाने फटके मारल्यानंतर सुद्धा ते सुधारायला तयार नाहीत.

Exit mobile version