‘महाबोगस आघाडी सरकारने पोलिसांना वेळ दिलेला दिसतोय!’

‘महाबोगस आघाडी सरकारने पोलिसांना वेळ दिलेला दिसतोय!’

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जोगेश्वरीतून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना पकडले होते, त्यांच्याशी याचा संबंध असावा असा संशय व्यक्त केला जात आहे, पण यानिमित्ताने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका होते आहे.

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, वसुली आणि खंडणीतून महाबोगस आघाडी सरकारने पोलिसांना वेळ दिलेला दिसतोय.

दिल्ली पोलिसांनी जेव्हा सहा दहशतवाद्यांना अटक केली त्यात जान मोहम्मद हा मुंबईचा एक दहशतवादी होता. सायन, धारावी येथे तो राहात होता. पण त्याच्या सहभागाबद्दल मुंबई पोलिसांना कोणतीही खबर नव्हती, हे दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार भातखळकर यांनी ही टीका केली आहे.

एटीएसनेही नंतर पत्रकार परिषद घेत जान मोहम्मद या दहशतवाद्याबद्दल माहिती दिली होती. पण त्याला अटक करण्यापूर्वी एटीएसला त्याची खबरही नव्हती हेच त्यातून दिसून आले. त्यामुळे एटीएस ही आता आपली कातडी वाचविण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन माहिती देत आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला.

हे ही वाचा:

टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?

अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी

पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले

बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आहेत. अँटिलिया प्रकरणातही सचिन वाझेही या प्रकरणात आरोपी आहे. त्याच्यावरील आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या सगळ्यांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे आता दहशतवादी सापडल्यानंतर मुंबई पोलिस पुन्हा कार्यरत झाल्याचे पाहून ठाकरे सरकारने पोलिसांना त्यांचे नियमित काम करण्यास मुभा दिली आहे का, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Exit mobile version