शिवसेनेचे आमदार संजय बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी केली. पण नंतर त्यांनी घुमजाव करत हे पत्र आपण लिहिलेले नसल्याचा दावा केला. या घटनेवरूनच आता राज्यातील विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘मुख्यमंत्री अजुन किती जणांचा आवाज दाबणार?’ असा सवाल केला आहे. तर आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर बंधने आणायची हुकूमशाही वृत्ती चालणार नाही असे भातखळकर यांनी खडसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलताना भातखळकर यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
हे ही वाचा:
हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण
भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग
आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस
… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही
काय म्हणाले भातखळकर?
कळंबोलीचे शिवसेनेचे आमदार संजय बांगर यांचे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमधील विलीनीकरण करा हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आतला आवाज आहे. भले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव आणून हे पत्र मी लिहिलेलं ते असं त्यांना म्हणायला लावले असेल. पण मुख्यमंत्री महोदय अजून किती जणांचे आवाज दाबणार आहात? तुम्हाला मोदीजींच्या बाबतीत किंवा विरोधात काही बोलायचं असेल तर तुम्हाला लगेच कंठ फुटतो. पण ६७ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या पण यावर आपण अजून एक शब्द बोलायला तयार नाहीत. पक्षातले किंवा पक्षाच्या बाहेरचे बोलले की त्यांच्यावर मात्र बंधने आणायची. ही हुकूमशाही वृत्ती चालणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्हाला न्याय द्यावाच लागेल. त्यांचे पगार वाढवावेच लागतील आणि त्यांना तुम्हाला मदत करावीच लागेल हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे.