भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी

भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी

आमदार भातखळकर यांनी सोडले टीकास्त्र

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला डोकी शोधली. लोकांचा संताप खड्ड्यात घालणार हे लक्षात आल्यावर पुरामुळे झालेल्या नुकसानीचा ठपका प्रशासकीय अधिकाऱ्यावर फोडून ते मोकळे झाले आहेत. जबाबदारीतून ठाकरे सरकारची कशी अलगद सुटका करतायत पाहा… लोक विश्वास ठेवतील का या तमाशा वर? अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर प्रहार केला आहे.

आमदार भास्कर जाधव कोकणातील एका बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोकणातील गलथानपणासाठी जबाबदार धरतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून भास्कर जाधव यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

कोकणात आलेल्या महापुरानंतरही तेथील प्रशासन यंत्रणा ढिम्म होती. एनडीआरएफची पथके बचावकार्यासाठी प्रयत्नांची शर्थ करून पोहोचली. विरोधी पक्षनेतेही तिथे पोहोचले पण शासनाकडून हालचाल झाली नाही. त्यावरून ठाकरे सरकारवर सर्वसामान्य चिडले. त्याची प्रचीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर असताना आली. एका महिलेने केवळ आश्वासने देऊ नका, आमदार-खासदारांचे दोन महिन्याचे पगार इथे वळवा अशी संतप्त मागणी केली.

हे ही वाचा:
मदत घेऊन निघाले भाजप युवा मोर्चाचे ट्रक…

मिराबाई चानूला मणिपूर सरकारकडून ही भेट…

पुजारी टोळीचा शार्पशूटर सादिक बंगाली गजाआड

धक्कादायक! शवांना हाताळण्यासाठी १०० इंजीनियर्सनी केले एवढ्या जागांसाठी अर्ज

त्याच दौऱ्यात भास्कर जाधव यांच्या अरेरावीने सरकारची चांगलीच नाचक्कीही झाली. त्यांनी एका महिलेवर हात उगारल्याच्या घटनेनंतर पुरामुळे पिचलेल्या लोकांमध्ये आणखी रोष दिसला. व्यापाऱ्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेराव घालून दुकानदार, व्यावसायिकांना आता मदतीचा हात द्या, अशी कळकळीची विनंती केली. सत्ताधाऱ्यांनी कोकणाकडे पाठ फिरविल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळेच भास्कर जाधव यांनी प्रशासनावर फोडलेले खापर हे एक नाटक असल्याची टीकाही केली जाऊ लागली.

Exit mobile version