उद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन!

उद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन!

उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजच्या युगातील तेनाली रामन असावेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडविली आहे.

उद्धव ठाकरे हे १३ प्रमुख राज्यांत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आल्याचे एक वृत्त प्रसारित झाले होते. त्याचा दाखला देत आमदार भातखळकर यांनी हा चिमटा काढला आहे. आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेबाबत केल्या गेलेल्या दाव्यावर ही टिप्पणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विविध स्तरावर अपयशी ठरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमासंवर्धनाचा प्रयत्न सुरू आहे. माध्यमांनीही लोकप्रिय मुख्यमंत्री कोण असे प्रश्न विचारत त्यातून उद्धव ठाकरे यांना लोकप्रिय घोषित करण्याचा प्रयत्न याआधीही केला आहे. आता हे नवे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी

आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय

पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

मजेची बाब म्हणजे १३ राज्यांतून सर्वोत्तम मुख्यमंत्री निवडताना त्यासाठी अवघ्या १७ हजार ५०० मतांचाच विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, बिहार, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, गोवा आणि हरयाणातून हे सर्वेक्षण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

१३ राज्यांतून जर ही मते घेतली गेली असतील तर प्रत्येक राज्यातून अवघ्या १३०० मतदारांची मते विचारात घेण्यात आली आहेत. यावरून या सर्वेक्षणातला फोलपणा लक्षात येतो. तरीही या सर्वेक्षणामुळे महाविकास आघाडीला कसे बळ मिळाले आहे, असा दावा केला जात आहे.

Exit mobile version