25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणराऊत, अंधारे यांना अजून पक्षात कशाला ठेवले आहे ?

राऊत, अंधारे यांना अजून पक्षात कशाला ठेवले आहे ?

अतुल भातखळकर यांचा रोखठोक सवाल

Google News Follow

Related

राऊत, अंधारे यांना अजून पक्षात कशाला ठेवले आहे ? जे तुकाराम महाराजांचा अपमान करतात, ज्ञानेश्वरांचा अपमान करतात , संत एकनाथ महाराजांचा अपमान करतात , हिंदू संस्कृतीचा अपमान करतात अशी व्यक्ती स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कशी राहू शकते याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे असा रोखठोक सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे आज मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीमध्ये मांगो आंदोलन  करण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करत आहेत.

सुषमा अंधारे व संजय राऊत यांना माफी मागावीच लागेल, असे सांगून भातखळकर म्हणाले, मविआ नकली आक्रोश मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्याकरता ते किती बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करतात, रामकृष्ण, हिंदूसंस्कृती यांच्या विरोधात ते बोलतात हे त्यांचं सगळं खोट बोलणं, महाराष्ट्रद्रोही बोलणं, देव-देश आणि धर्माच्या विरोधात बोलणं जनतेसमोर आणण्याकरीता , त्या विरोधात महाराष्ट्राचा आवाज ऐकवण्याकरता मुंबई भारतीय जनता पक्षाच्यावतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

महाराष्ट्राचे खरे गुन्हेगार, महाराष्ट्राचे द्रोही कोणी असतील तर ती उद्धव ठाकरे यांची जनाब सेना आहे.अजित पवार, नवाब मलिक, काँग्रेस या सगळ्यानी महाराष्ट्र धर्माचं, हिंदू संस्कृतीचं नुकसान केलं आहे. त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन आहे असे भातखळकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा