भाजपा नेते अतुल भातखळकरांनी उडविली खिल्ली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना फक्त पश्चिम बंगालच्या विचारी आणि संयमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीच करता येईल, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडविली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांदरम्यान प्रचंड दडपशाही केली. भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, त्यात अनेकांची हत्याही झाली. अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या घरात शिरून नासधूस केली गेली, आगी लावल्या गेल्या, महिलांवर बलात्कार करण्यात आले. तीच दडपशाही महाराष्ट्रात सुरू झाली आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर विचारण्यात येऊ लागला आहे. त्याचे प्रत्यंतर या यात्रेत ठिकठिकाणी येऊ लागले आहे.
उद्धव ठाकरेंची तुलना फक्त प.बंगालच्या विचारी आणि संयमी मुख्यमंत्री @MamataOfficial
यांच्याशी करता येईल…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा सुरू केल्यानंतर शिवसेना बिथरल्याचे चित्र दिसते आहे. ही जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यावर कोरोनाचे निर्बंध पाळले जात नसल्याची टीका शिवसेनेकडून केली जाऊ लागली. नियम पाळा नाहीतर जनआशीर्वाद यात्रेवर बंदी घालावी लागेल, असा इशाराही देण्यात येऊ लागला. त्यासंदर्भात नारायण राणे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
कचाट्यात सापडलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका
ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’
सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली
हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!
मुंबईत याच जनआशीर्वाद यात्रेसाठी आलेले नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले तेव्हाही या स्मृतिस्थळाला भेट घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून दिला गेला होता. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मात्र त्यांनी दर्शन घेतल्यावर या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यावरून पुन्हा शाब्दिक चकमकींना प्रारंभ झाला. आता नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर तर त्यांना अटक करण्यात आली. एकूणच पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे ममता दिदींनी आक्रस्ताळी राजकारण केले, तीच स्थिती महाराष्ट्रातही आहे की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला.