कांगावा करणे, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे अशा बेशरमपणाचा एकाधिकार तूर्तास ठाकरे सरकार आणि विशेषतः शिवसेनेकडे आहे. प्रत्येकवेळेला भाजपाकडे बोट दाखविण्याआधी कधी तरी झाल्याप्रकाराबद्दल हळहळ तरी व्यक्त करा, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
साकीनाका, अंधेरी येथे एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. त्या महिलेवर दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच अत्याचार करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा कडेलोट झाला आहे. ती महिला रुग्णालयात उपचार घेत असताना आता मृत्युमुखी पडली आहे, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तरीही सरकारतर्फे फारशी कठोर अशी पावले उचलण्यात आलेली नाहीत. खासदार संजय राऊत यांनी तर या घटनेवर काही ठोस बोलण्यापेक्षा विरोधकांनी या घटनेचे राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे, असे विधान केले आहे. त्यावर भातखळकर यांनी खरपूस टीका केली आहे.
हे ही वाचा:
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा
जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ उरत नाही
कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे
‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर
साकीनाका येथे गुरुवारी पहाटे ही संतापजनक घटना घडली. यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आणखीही काही लोक यात सहभागी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कांगावा करणे, मृतांच्या डोक्यावरचं लोणी खाणे अशा बेशरमपणाचा एकाधिकार तुर्तात ठाकरे सरकार आणि विशेषतः शिवसेनेकडे आहे.
प्रत्येक वेळा भाजपाकडे बोट दाखवण्याआधी कधी तरी झाल्या प्रकाराबाबत हळहळ तर व्यक्त करा… pic.twitter.com/VAqKoP42q5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2021