‘राज्यात गुंतवणूक आणणं वाझेला पाळून वसुली करण्याइतकं सोप्प नाही’

आमदार अतुल भातखळकर यांनी लोंढे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘राज्यात गुंतवणूक आणणं वाझेला पाळून वसुली करण्याइतकं सोप्प नाही’

महाराष्ट्रात सॅफ्रन कंपनीच्या प्रकल्पाला जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला. आधी वेदांत फॉक्सकॉन, आता टाटा एअर बस हे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याने काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर टीका केली. मात्र भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लोंढे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

सॅफ्रन कंपनीच्या प्रकल्पाला जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला. यावर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. अतुल भातखळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अतुल लोंढे, नाना पटोले आणि अडीच वर्ष घरात बसलेले उद्धव ठाकरे हे थापा मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जमीन न मिळाल्याने प्रकल्प हैदराबादला गेला असं म्हटलं जातं आहे. मग अडीच वर्ष सरकार कोणाचं होतं? अडीच महिन्यात जमीन मिळत नाही. यांनी अडीच वर्ष काय केलं? असे सवालच भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

वेदांता फॉक्सकॉन सामंजस्य करार झाल्यानंतर त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने ठराव मंजूर केला का? अधिकाऱ्यांच्या बरोबर गाठीभेटी घेतल्या का? सवलत किंवा आणखी काय याबाबदल चर्चा केली का? असे प्रश्नच त्यांनी यावेळी उपस्थित केले. महाविकास आघाडी न संबोधता भातखळकरांनी महाभकास आघाडी असं म्हणत टीका केली आहे.

टाटा एअर बस प्रकल्पाबद्दलसुद्धा यावेळी अतुल भातखळकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, टाटा एअर बस आणि डीआरडीओचा सामंजस्य करार २४ सेप्टेंबर २०२१ रोजी झाला. ज्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. देशातील दोन कंपन्यांमध्ये करार झाल्यानंतर तो प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरता महाराष्ट्राचे घरी बसलेल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केला.

हे ही वाचा:

सूर्यदेव आणि सौर ऊर्जेबद्दल पंतप्रधान मोदींना काय वाटते?

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

आदित्य ठाकरे आणि आघाडीला माझं एवढंच सांगणं आहे की, राज्यात गुंतवणूक आणणं वाझेला पाळून वसुली करण्याइतकं सोप्प नाही. त्याकरता मेहनत करावी लागते, निर्णय घ्यावे लागतात. पण त्याऐवजी त्यांनी उद्योग बाहेर कसे जावे यासाठी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक तेहवणाऱ्या माणसाला कामावर ठेवलं, अशी टीका भातखळकरांनी केली आहे. पण आता गुंडगिरीचं वातावरण संपलं असून आता महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प येतील, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version