नवाब मलिकांचे संतुलन बिघडले आहे

नवाब मलिकांचे संतुलन बिघडले आहे

‘समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे नवाब मलिक यांच्या जावयाला आठ महिने तुरुंगात जावं लागलं म्हणून मलिक यांचे संतुलन बिघडले आहे’ असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एका क्रूज पार्टीवर केलेल्या कारवाईवर नवाब मलिक यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर आक्रमक झाले असून त्यांनी नवाब मालिकांवर तोफ डागली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसापूर्वी मुंबई येथील एका क्रूज पार्टीत धाड टाकली होती. या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केले जात होते. एनसीबीला याची माहिती मिळाल्यामुळे एनसीबीचे अधिकारी वेशांतर करून या पार्टीत शिरले होते. या कारवाईत एसीबीच्या अधिकाऱ्यांना चरस, कोकेन, एमडी ड्रग्स असे विविध अंमली पदार्थ मिळाले. तर या धडक कारवाई आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे

जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स

सुरुवातीला नवाब मलिक यांनी या कारवाई दरम्यान भाजपाशी संबंधित दोन लोक उपस्थित असल्याचा आरोप केला आहे. तर एनसीबी मार्फत हे आरोप फेटाळण्यात आले असून नवाब मलिक यांनी आरोप केलेल्या व्यक्ती साक्षीदार असल्याचे सांगण्यात आले होते. पण तरीदेखील नवाब मलिक यांचे समाधान झाले नसून त्यांनी आरोपांच्या फैरी सुरू ठेवल्या आहेत. या प्रकरणात भाजपा नेत्याच्या नातेवाईकांना सोडल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर एनसीबीची कारवाई प्रसिद्धीसाठी सुरू आहे असेही मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्या या आरोपांना अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे नवाब मलिक यांच्या जावयाला आठ महिने तुरुंगात काढावे लागले त्यामुळे मलिकांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपा नेत्यांवर काळाबाजार करत असल्याचे आरोप केले होते. पण त्यांच्याच सहकारी मंत्र्यांनी ते आरोप खोटे असल्याचे सांगितले. भाजपा कोणत्याही चौकशीला भीत नाही असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version