केंद्रीय मंत्र्यांनी का केले इटालियन भाषेत ट्विट?

केंद्रीय मंत्र्यांनी का केले इटालियन भाषेत ट्विट?

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा असून अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत सगळेच यावर सक्रिय असतात. ट्विटर हे माध्यम तर सामाजिक,राजकीय चर्चांचा आखाडाच आहे. भारत सरकारचे अनेक मंत्री या प्लॅटफॉर्मवर नियमीतपणे व्यक्त होतात आणि त्याची चर्चा असते. सध्या असेच भारत सरकारचे दोन मंत्री चर्चेत आहेत त्यांच्या इटालियन भाषेतील ट्विट्समुळे.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि स्मृती इराणी यांचे इटालियन भाषेतले ट्विट सध्या चांगलेच गाजत आहे. या दोघांनीही इटालियन भाषेत ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पाँडीचेरी येथे मासेमारी करणाऱ्या नागरीकांसमोर राहुल गांधी बोलत होते. तेव्हा बोलताना त्यांनी शेतकरी कायद्यांचा विषय काढला. पुढे ते म्हणाले “तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी मासेमारी करणाऱ्यांच्या मिटींग मधे शेतकरी कायद्यांविषयी का बोलतोय. पण माझ्यासाठी तुम्हीही समुद्रातले शेतकरी आहात.जर जमिनीवरच्या शेतकऱ्यासाठी दिल्लीत मंत्रालय आहे तर समुद्रातल्या शेतकऱ्यासाठी का नाही?”

राहुल गांधीच्या या विधानाने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जाऊ लागली कारण नरेंद्र मोदी सरकारने २०१९ सालीच या मंत्रालयाची स्थापना केली आहे. गिरिराज सिंह हे या खात्याचे मंत्री असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे. या ट्विट्सपैकी एक ट्विट त्यांनी इटालियन भाषेत केले आहे.

“प्रिय राहुल गांधी, इटलीमध्ये मत्स्यव्यवसायाचे कोणतेही स्वतंत्र मंत्रालय नाहीये. त्याचा समावेश कृषी आणि वन मंत्रालयातच होतो.” असे सिंह यांनी इटालियन भाषेत लिहिले आहे.

यावरच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही इटालियन भाषेत ट्विट करत राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. “त्यांना फक्त खोटी,चूकीची माहिती आणि भय पसरवता येते.”

Exit mobile version