काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संसदीय बोर्डात निवड झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी उद्योजकांसमोर काही वक्तव्ये केली आहेत. त्यावेळी नितीन गडकरी यांनी एक आठवण सांगितली आहे. जेव्हा नितीन गडकरी विद्यार्थी संघटनेसाठी काम करत होते तेव्हा डॉ. श्रीकांत जिचकार यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये येणार नाही, असे सडेतोड उत्तर त्यावेळी नितीन गडकरी यांनी दिले होते.
पुढे व्यावसायिकांना सल्ला देताना गडकरी म्हणाले की, जे कोणी व्यवसायात, सामाजिक कार्यात किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे मोलाचा सल्ला देतो की, एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही ज्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका अस देखील गडकरी म्हणाले. याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थित असलेल्यांना दिला आहे.
गेल्या आठवड्यात भाजपाच्या संसदीय बोर्डात नितीन गडकरी यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यावेळी अनेकांनी यावर टीका केली होती. राजकीय फायद्यासाठी त्यांच्या वक्तव्यांना चुकीच्या आधाराने सादर करण्यात आले होते. यावर नितीन गडकरींनी आक्षेप नोंदवला आहे.
हे ही वाचा:
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!
मी जेव्हा तरुण वयात विद्यार्थी चळवळीत काम करीत होते.त्यावेळी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते. तुम्ही ज्या पक्षात आहेत तिथे तुमचे भविष्य नाही. मात्र त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की, मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही.