उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे

उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपाचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. रंगतदार निवडणुकीत शिवसेना काही नवीन खेळी खेळते का? याकडे उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलं होतं.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी आणि शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहता यांनी अर्ज दाखल केले होते. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे ८, रिपाइं १, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी १ सदस्य आहे. त्यातच भाजप आणि रिपाइं एकत्र आल्यामुळे यंदा भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात होते. टोनी सिरवानी यांनी अनेक वर्ष उल्हासनगर महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे.

मागील निवडणुकीत समसमान संख्याबळ असताना शिवसेनेनं भाजपाच्या एका सदस्याला फोडून थेट सभापती केलं होतं. त्यामुळे यंदा फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपानं आपले सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले होते. यावेळी कुठलाही दगाफटका न होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्याच्या साथीने भाजपाला स्थायीच्या सभापतीपदी आपला उमेदवार बसवण्यात यश आले.

हे ही वाचा :

हमेल्सच्या स्वयंगोलच्या जीवावर फ्रान्स शिलेदार

कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु

काँग्रेसमध्ये भाई जगताप विरुद्ध झिशान सिद्दिकी

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय

दुसरीकडे चार प्रभाग समित्यांसाठी भाजपातर्फे अनुक्रमे मीना कौर लबाना, महेश सुखरामानी, रवी जग्यासी आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी अर्ज भरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून हरेश जग्यासी आणि अंजना म्हस्के, छाया चक्रवर्ती, दीप्ती दुधानी, विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र खरी रंगत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीतच होती.

Exit mobile version