ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?

भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केला घणाघात

ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?
जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर त्यात आंदोलक आणि पोलिसही जखमी झाले. त्यानंतर आता राजकारण तापू लागले असून विरोधकांनी जालन्यात जाऊन जखमींची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात लाठीचार्जचा व्हीडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. त्यावरून भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

त्या म्हणाल्या की, ओ मोठ्ठ्या ताई, मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहिला असता. मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही ? मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण? ताई, ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि कोर्टात लढाई लढणं या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस जी यांनी केल्या आहेत. पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुमचं लक्ष्य आहे.

 

हे ही वाचा:

आदित्य एल1 सूर्याकडे झेपावले!

धक्कादायक! राजस्थानमध्ये विवाहितेची पती आणि सासरच्यांकडून नग्न धिंड

आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक हवी

चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार

राष्ट्रवादी पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली म्हणून तुमची जळजळ होणं स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, ही विनंती आहे. तुमच्या कार्यकाळात तुम्ही मावळमध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे. समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासू वृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे. आता मराठा आरक्षणाचा खोटा कळवळा दाखवताय? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोईस्कर विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. आत्ता ही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता मग आत्ताच कसा काय पेटतोय याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. जर हे जाणून बुजून घडवलं जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहीजे. ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती…

Exit mobile version