राज्यात सध्या तीन सरकारं चाललेत आणि प्रत्येक सरकारला असं वाटतं की आपलं सरकार आहे तेच खरं सरकार आहे असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. राज्यातल्या या तिन्ही सरकारांना कोरना बाबत मात्र भरपूर संभ्रम आहे असे पाटील यांनी म्हटले आहे.
गुरुवार, ३ जून रोजी महाराष्ट्र सरकारमचा लॉक-अनलॉकच्या मुद्द्यावरून सुरु असलेला गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी राज्य सरकारमधील विसंवाद सुद्धा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार असल्याची घोषणा गुरुवारी संध्याकाळी केली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण अजून राज्यातील कडक निर्बंध हटवले गेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे असे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आल्यानंतर नागरिकांची निराशा झाली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर जाहीर करण्यात आले की राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्या प्रक्रारे अनलॉकचा कोणताही निर्णय झालेला नाही.
हे ही वाचा:
…आणि मोसाद स्टाइल चोक्सी झाला जेरबंद!
अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल
सरकारच्या या सावळ्या गोंधळानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने तर सरकारची खरडपट्टी केली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. राज्यात एक नाही तर तीन सरकारे कार्यरत आहेत आणि प्रत्येक सरकारला असे वाटते की आपलेच सरकार हे खरे सरकार आहे असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तर या सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. राज्यातील केवळ ४ घटकांना १५०० रुपयांच्या मदतीचे आश्वासन देऊन आम्ही किती उदार आहोत, हे राज्य सरकार दाखवत आहे असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वाटतंय की, मीच खरं सरकार आहे. तिघांनाही कोरोनाबाबत संभ्रम आहे. या सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. राज्यातील केवळ ४ घटकांना १५०० रुपयांच्या मदतीचे आश्वासन देऊन आम्ही किती उदार आहोत, हे राज्य सरकार दाखवत आहे. pic.twitter.com/qmt5KV2Igo
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 4, 2021