महाराष्ट्र भाजपाचा कार्यकारणी विस्तार! पुरोहित, निलंगेकर, पाठक यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या

महाराष्ट्र भाजपाचा कार्यकारणी विस्तार! पुरोहित, निलंगेकर, पाठक यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचा विस्तार केला आहे. या विस्तारात राज पुरोहित, अरविंद पाटील निलंगेकर तसेच विश्वास पाठक यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. राज पुरोहित यांच्यावर उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर अरविंद पाटील निलंगेकर हे सचिव म्हणून कार्यरत असणार आहेत. महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम विभागाचे प्रमुख असणाऱ्या विश्वास पाठकांकडे आता प्रवक्ता म्हणून जबाबदरी असणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकारणीचा विस्तार केला आहे. यात राज पुरोहित आणि अरविंद पाटील निलंगेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर विश्वास पाठक यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी मुंबई अध्यक्ष राहिलेले तसेच विधान सभेतही भाजपाचे आमदार राहिलेले राज पुरोहित यांची महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर लातूरचे अरविंद पाटील निलंगेकर यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अरविंद निलंगेकर हे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आहेत. पाटील यांच्यावर संघटनेच्या शक्ती केंद्र आणि बूथ रचनेची विशेष जबाबदारी असणार आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारकडून हिंगोली जिल्ह्याला ७० कोटी

ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?

उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका

विश्वास पाठक यांच्याकडे आधी महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम विभागाची सूत्रे देण्यात आली होती. पण आता त्यांची प्रवक्ता म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यासोबतच त्यांच्याकडे भाजपा महाराष्ट्राच्या उद्योग आघाडी, व्यापारी आघाडी आणि आर्थिक आघाडीचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Exit mobile version