ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा डंका, एकनाथ शिंदेंनाही भरघोस प्रतिसाद

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा डंका, एकनाथ शिंदेंनाही भरघोस प्रतिसाद

राज्याच्या विविध भागातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या २७१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये ८२ ग्रामपंचायतीत मुंसंडी मारत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपली आघाडी कायम ठेवली आहे. राज्यात झालेल्या सत्तांतराचे पडसादही या निकालात उमटले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत २७ जागांसह शिवसेना चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. तर एकनाथ शिंदे यांनीही ४० जागांसह तिसरे स्थान मिळवले आहे. शिवसेनेतील वादंगांचा फायदा घेत राष्ट्रवादी ५३ ग्रामपंचायतींसह दुसऱ्या क्रमांकावर तर कॉंग्रेस २२ जागांसह पाचव्या स्थानावर आहे.

राज्य निवडणूक आायोगाने जून महिन्यात २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. राज्यातल्या २७१ ग्रामपंचायतींपैकी काही पूर्णत: तर काही अंशत: बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी राज्यात मंगळवारी मतदान झाले. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २७७ पैकी २६६ ग्रामपंचायतींचे निकाल काय लागणार याबद्दलची उत्सुकता टीपेला पोहचली होती. आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

कोयना वसाहत ग्रामपंचायत भाजपकडे

साताऱ्यातल्या कोयना वसाहत ग्रामपंचायतीवर भाजपने वरचष्मा दाखवला आहे. या ग्रामपंचायतीमधील १७ पैकी १० जागांवर विजय मिळवून अतुल भोसले यांना सत्ता कायम राखण्यात यश आले आहे.

पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात पंकजा मुंडे यांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे. या तालुक्यात भाजपने तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. येथे भाजप व राष्ट्रवादीने कॉंग्रेसला तालुक्यातून हद्दपार केले आहे. बीड जिल्ह्यात भाजपने दगडवाडी, श्रीरामवाडी, चन या तिन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

शिंदे गटाचे वर्चस्व

शिंदे गटाने ४० ग्रामपंचायतींसह तिसरे स्थान पक्के केले आहे. सोलापूरातल्या टाकळी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. उस्मानाबादमधील सोनेगाव आणि सिल्लोड मतदार संघावर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे.

Exit mobile version