काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला कर्नाटक आणि तेलंगणात विजय मिळवता आला होता. मात्र राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रा २’ नंतरही जर भाजप केंद्रामध्ये संपूर्ण बहुमतानिशी सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरत असेल तर, काँग्रेसच्या रणनितीकारांना स्वतःच्या रणनितीवर पुनर्विचार करण्याची गरज पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणामध्ये भाजपला आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. तर, काही सर्वेक्षणात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असे सांगितले जात आहे. या सर्वेक्षणानुसार, निकाल लागल्यास विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. त्यात राहुल गांधींचाही समावेश आहे.
भारत जोडो यात्रेमुळेच काँग्रेसला कर्नाटक आणि तेलंगणात सत्ता स्थापन करता आली, असे मानले जात आहे. मात्र भारत जोडो न्याय यात्रा २ नंतरही भाजपला जर केंद्रात संपूर्ण बहुमत मिळाले तर काँग्रेसच्या रणनितीकारांना त्यांच्या रणनितीचा पुनर्विचार करावा लागेल.
काय म्हणतात, मतदार सर्वेक्षणाचे निकाल
एबीपी सी व्होटरने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ४१ हजार ७६२ लोकांनी सांगितल्यानुसार, भाजप बिहारसारख्यार राज्यांत पुन्हा बळकट स्थितीत येऊ शकते. राजस्थानमधील २५ आणि दिल्लीतील सातही जागा भाजप जिंकू शकते. तर, दक्षिणेत आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने भाजप आघाडीला २५ ते ३० जागा मिळू शकतात. त्यामुळे मतदान पूर्वोत्तर सर्वेक्षणानुसार, एनडीएला आघाडी मिळू शकते.
एनडीए मजबूत स्थितीत
देशातील २१ राज्यांमधील ५१८ लोकसभा क्षेत्रात एक लाख १८ हजार लोकांचे मत जाणून घेत न्यूज १८ पोल हबने निष्कर्ष जाहीर केला आहे. त्यानुसार, एनडीएला ४११ जागा मिळू शकतात. भाजप एकट्याच्या बळावर सुमारे ३५० जागा मिळवू शकते. या सर्वेक्षणानुसार, भाजप आघाडीला एकट्या उत्तर प्रदेशमध्येच ७७ जागा मिळतील.
एनडीएला ३७८ जागा?
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या दाव्यानुसार, एनडीएला ५४३ जागांपैकी ३७८ जागांवर विजय मिळू शकतो. तर, ‘इंडिया’ला १००हून कमी जागाच मिळतील, असा अंदाज आहे.
हे ही वाचा..
१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांना अटकपूर्व जामीन
आता शिक्षकांनी कपडे कोणते घालावेत हे शाळा ठरवणार!
लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक
‘विरोधी पक्षांच्या हातून सर्व काही निसटलेले नाही’
राजकीय विश्लेषक राकेश कुमार यांच्या मते, सध्या भाजपची चाललेली तयारी, पंतप्रधानांची लोकप्रियता, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, राममंदिराची निर्मिती, सीएए आणि समान नागरी कायद्यामुळे भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळेल. मात्र तरीही विरोधी पक्षांच्या हातून सर्व काही निसटलेले नाही. राहुल गांधी यांची महिला व तरुणांच्या घोषणा भले अन्य राज्यांत काम करू शकत नसतील, परंतु कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि केरळ-तमिळनाडू राज्यांत भाजपसमोर अडचणी निर्माण करू शकतात. मणिपूरबाबत लोकांची प्रतिक्रिया काय आहे, हेही विचारात घ्यावे लागेल. विरोधी पक्ष सर्व सामर्थ्यानिशी मैदानात उतरला, तरीही समीकरणे बदलू शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.