बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपाच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजपा असेही पाहिले जाते.
याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह १० जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील १५ पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंगला अंगडी यांना बेळगावमध्ये १३ हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणूक आणि बेळगाव लोकसभेचा इतिहास पहाता ही आघाडी अधिकच मोठी होऊन भाजपच्या मंगला अंगडी यांना विजय मिळेल असे चित्र आहे.
हे ही वाचा:
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ
२८ वर्षीय ऋग्वेद कुलकर्णीचे कोरोनामुळे निधन
या निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे देखील बेळगावला गेले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी बेळगावला गेले होते.