‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल

एकीकडे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करून आज त्यांच्या घरांवर छापे मारल्यानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टोकदार टीका करताना म्हटले आहे की, आता एका अनिलवर थांबून चालणार नाही. आणखी जे अनिल आहेत त्यांच्यापर्यंत सीबीआयने पोहोचावे. भातखळकर म्हणाले की, लोकांना हेच अपेक्षित होतं. आता अनिल देशमुखांवर एफआयआर झाल्यानंतर कस्टडीत ठेवून त्यांची प्रत्यक्ष चौकशी करता येईल. चौकशी करणं सीबीआयला सहज शक्य होईल. हे एकूणच स्वागतार्ह पाऊल आहे. मात्र हे
निबर आणि निर्लज्ज राज्य सरकार आहे त्यामुळे त्याचा राजकीय परिणाम होईल, असे वाटत नाही. एका अनिल वर थांबून चालणार नाही. आणखी अनिल जे आहेत त्यांच्यापर्यंतही पोहोचावे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे

देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद

सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकात

अनिल परबांचीही चौकशी करा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात भाजपा राजकारण करत असल्याचे आरोप करणाऱ्यांवर शरसंधान केले आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात परमबीर गेले. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. उच्च न्यायालयाने मग सीबीआयची चौकशी करण्यास सांगितले. म्हणूनच भाजपामुळे हे सगळे सुरू आहे, हे आरोप अगदी हास्यास्पद आहेत. खरे तर, आता काहीजण सुपात आहेत, काहीजण जात्यात आहेत. काळजी करू नका, परमेश्वर सगळ्यांचा हिशेब चुकता करतो. आता अनिल परबांवरही सीबीआय कारवाई झाली पाहिजे. अनिल परबांनी वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडून धमकावून पैसे घ्यायला सांगितले होते, असा वाझेचा आरोप होता. त्यामुळे अशी चौकशी सीबीआयने केली पाहिजे. पूर्वी म्हटलं जात असे की, या जन्मी जे कराल ते पुढच्या जन्मी भोगावे लागेल. पण आता या जन्मी जे कराल ते याच जन्मी भोगावे लागेल.

Exit mobile version