संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, संजय राऊत यांनी त्या नेत्यांची नावे घेतलीच नाही. त्यामुळे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होताच भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, त्यांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना इतकीच प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन दिवस इतका आवाज करून फुसका बार ठरला. अपशब्द वापरणे ही त्यांची संस्कृती आहे. आमच्याही घरात लग्न झाले. पण आमच्या घरात कधी ईडी नाही पोहचले. संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेले आरोप गळ्याशी येताच त्यांनी शिवसेना वापरली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केली ८९ पानांची तक्रार
दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड
हे आहेत इस्रोचे अंतराळातील ‘त्रिमूर्ती’
साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर
विधान परिषेद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा तर अगदीच फुसका बार असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. आपटी बार पण बरा असतो अशीही टीका त्यांनी केली आहे. दोन दिवस साडे तीन नेते कोण असणार याची चर्चा करून त्या नेत्यांची नावे सांगितलीच नाहीत, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. गृह खाते तुमच्याकडे आहे. मग मागणी कशासाठी करत आहात? मागणी विरोधक करत असतात. मात्र, इथे यांचे उलटे आहे. सत्ताधारीच विरोधी नेत्याच्या घरावर आंदोलन करत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.