भाजपा नेते रुग्णालयात ममतांच्या भेटीला

भाजपा नेते रुग्णालयात ममतांच्या भेटीला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विचारपूस करण्यासाठी भाजपा नेते गुरुवारी कोलकाता येथील सेठ सुखलाल करनानी मेमोरियल (एसएसकेएम) रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याने भाजपा नेत्यांना ममतांची भेट न घेताच परतावे लागले. भाजपा नेते तथागत रॉय आणि भाजपाचे अन्य काही नेते रुग्णालयात गेले होते. डॉक्टरांनी मनाई केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अरुप विश्वास यांना भेटून हे नेते परत आले.

तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांकडून ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या या हल्ल्याचा तपास सुरु आहे. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक विवेक सहाय आणि ज्ञानवंत सिंह यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, ममता बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या ताफ्यात १८ गाड्या आणि एडव्हान्स पायलट कार असताना ममता यांच्यावर हल्ला झालाच कसा? असा सवाल भाजपाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यात ३ एस्कॉर्ट कार, २ इंटरसेप्शन कार, महिला पोलिसांची एक गाडी, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकांच्या तीन गाड्या, टेल कार आणि स्पेअर इंटरसेप्शन कारचा समावेश असतो. चार पायलट कार ताफ्याच्या नेहमी पुढे असतात. यामध्ये डीएसपी आणि सब इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस अधिकारी असतात. मग इतक्या कडेकोट सुरक्षेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होऊच कसा शकतो? असा सवाल भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version