भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील भाजपा नेते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजपा नेत्यांमार्फत या हल्ल्याचा निषेध केला जात असून हल्लेखोरांवर चांगलेच टीकास्त्र डागले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सचिव निलेश राणे या साऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या हल्लेखोरांवर घणाघाती टीका केली आहे.
आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथे घोंगडी बैठका घेत आहेत. बुधवार, ३० जून रोजी रात्री एक घोंगडी बैठक संपवून दुसऱ्या बैठकीसाठी रवाना होत असतानाच पडळकर यांच्या गाडीवर चार ते पाच अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे. एक मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर फेकण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी पडळकर यांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या या दगड फेकीवरून भाजपा नेते चांगलेच बरसले आहेत
हे ही वाचा:
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
संकटात असलेल्या कोकणी माणसाची थट्टा थांबवा
शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा
‘पुरोगामी’ महाराष्ट्रात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आहे.. ‘एकाधिकारशाही नाही’
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी हल्लेखोरांवर सडकून टीका केली आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, पश्चिम बंगालमध्ये नाही असे दरेकर म्हणाले. तर ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आहे.. ‘एकाधिकारशाही नाही’ असा हल्लबोल त्यांनी केला.
आपण 'महाराष्ट्रात' राहतो..
'पश्चिम बंगाल' मध्ये नाही..!@GopichandP_MLC यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे! 'पुरोगामी' महाराष्ट्रात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आहे.. 'एकाधिकारशाही नाही'..!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 30, 2021
हा बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
पडळकर यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे राज्यातील बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा ताई वाघ यांनी व्यक्त केले आहे. तर विचारांची लढाई विचारांनी लढू दगडाने नाही असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
हा तर बहुजनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विचारांची लढाई विचाराने लढू…दगडाने नाही @CMOMaharashtra @maharashtra_hmo @GopichandP_MLC @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @BJP4Maharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2021
तुम्ही एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही
भाजपा महाराष्ट्र सचिव निलेश राणे यांनी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही असा इशारा राणे यांनी दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. pic.twitter.com/t1KVXLgO2Y
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 30, 2021