ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आज, २५ मे रोजी भाजपाकडून मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.
मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे ही या ठाकरे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे आंदोलनकर्त्यांच म्हणणे आहे. या आंदोलनाच्या वेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, चंद्राकांत पाटील, गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाजन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या ताब्यात घेतलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पंजाब मंत्रिमंडळातून हकालपट्टी
टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण अवैध ठरवल्यामुळे राज्यातील आगामी निवडणूका या ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील भाजप सुरवातीपासूनच ठाकरे सरकार विरोधात आक्रमक झाली होती. ठाकरे सरकार या ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत असे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे म्हणणे होते.
तर जोवर ओबीसींना त्यांचे आरक्षण मिळत नाही तोवर आपण शांत बसणार नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आपण संघर्ष करत राहणार असे भाजपाने जाहीर केले आहे.