छत्रपती शिवाजी पार्क भगवेमय होऊन गेलेलं आहे. वंदे मातरम, जय श्रीराम जो हिंदू हित का काम करेगा वही देश मी राज करेगा अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला आहे. लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकाळ हिंदू बांधव , भगिनी आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे. बळजबरीने आमिषाने धर्मांतराची प्रकरणे घडत आहेत. हा सगळा आक्रोश जनतेसमोर यावा आणि तो प्रदर्शित करण्यासाठी हा सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चात मी एक हिंदू आणि एक एक नागरिक म्हणून सहभागी झालो आहे मी भाजपचा आमदार आहे. त्यात हिंदू आहे त्यामुळे हिंदू म्हणून येथे आलेलो आहे , अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.
भातखळकर पुढे म्हणाले की, श्रद्धा वालकर संदर्भात माझीच लक्षवेधी लागली होती त्यावेळी मीच लव्ह जिहाद कायदा आणण्याची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी त्यावर आम्ही विचार करतो असे म्हटले आहे त्याचबरोबर उत्तराखंडची यासंदर्भातील शेती सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक दृष्ट्या वैध ठरवली त्यानंतर राज्यात सुद्धा सिव्हिल कोड, घटस्फोट आणि विवाह या करता लागू करावा, अशी मागणी मी केलेली आहे त्यावरही सरकार विचार करत आहे या विराट मोर्चामध्ये हिंदूंचा कैवार घेणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा कोठेही सहभाग नाही. त्यामुळे या मोर्चात सहभागी झालेल्यांची याबद्दल निषेध व्यक्त करतानाच जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाला भाजप नेत्यांनी लक्ष्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलं आहे. त्यांनी फक्त आता एमआयएमशी युती करायचं तेवढं बाकी आहे असा घणाघात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी सडकून टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही सहभागी झाले आहेत. मात्र, या मोर्चात ठाकरे गटाचं कोणीही हजर नाहीये. त्यावरून भाजपने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलं आहे. त्यांनी फक्त आता एमआयएमशी युती करायचं तेवढं बाकी आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी या मोर्च्याच्या माध्यमातून केली आहे. आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , केशव उपाध्ये, शीतल म्हात्रे, किरण पावसकर , सदा सरवणकर असे भाजप-शिंदे गटाचे नेते सहभागी झाले आहेत. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसत असून तरुणही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
हे ही वाचा:
४०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात
शिवाजी पार्कवर हिंदू .. आझाद मैदानात लिंगायत समाज आक्रमक
शिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी हिंदू समाज एकवटला
अडीच वर्षात हिंदूंना फक्त दाबण्याचा प्रयत्न झाला
मुंबईत भगवं वादळ दिसत आहे ते आता थांबणार नाही.. कोणी कितीही जिहादी आणून इथे हिरवे झेंडे फिरवण्याचा प्रयत्न केला. मुंबईचा डीएनए भगवा आहे, रक्त भगवच आहे. हे मुंबईकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जण आक्रोश मोर्चातून संदेश आहे. इशारा पण असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. गेल्या अडीच वर्षात हिंदूंना फक्त दाबण्याचा प्रयत्न झाला. हिंदूंची संख्या कशी कमी होईल याचा प्रयत्न लव्ह जिहाद, लंड जिहादच्या निमित्ताने केला गेला. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने हिंदू सणांवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये येणारे बांगलादेशी, रोहिंगे याना कोण पोसतो . कोण आधार आधार कार्ड देतो ते नवाब मॅजिक, असलं शेख आहेत. रोहिंगे आणि बांग्लादेशींना जाव्या प्रमाणे पोसल्या जातेय अशी जोरदार टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा घेऊन गावोगाव फिरत आहेत
सोमय्या हे मोर्चात शिवसेना भवनाच्या जवळ आले. त्यावेळी जन आक्रोश मोर्चात उद्धव ठाकरे यांचा सहभाग नसल्याबद्दल सोमाय्या याना विचारले. त्यावर उद्धव ठाकरे याना जोरदार टोला लगावताना सोमय्या म्हणाले, कशाची काय तुलना करण्याची गरज आहे. ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वात;च्या वडिलांची संस्कृती धर्म कर्तृत्व आजीवन भगवा झेंडा हाती धरला होता. ते आता मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा घेऊन गावोगाव फिरत आहेत. आज हिंदुस्थानात नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश धर्म-संस्कृतीच्या संरक्षणासाठी पुढे जात आहे. गेल्या काही वर्षात लव्ह जिहादच्या नावाने एक विचित्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होता आहे. आज देशात सगळीकडे हिंदू जागा झाला आहे.
फक्त हिंदू महिला म्हणून आलो
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, हिंदू बांधव नाही तर हिंदू भगिनीही इथे आल्या आहेत. आज राजकारण नाही. आम्ही फक्त हिंदू महिला म्हणून आलो आहोत. महिलांच्या मनातील आक्रोश सांगायला आलो आहोत. राजकारणाचा प्रश्नच येत नाही. इतर राजकीय पक्ष आमच्यावर आरोप करणारच. पण लोकांच्या मनात काय आहे हे सांगणं गरजेचं होतं. त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा करण्याची गरज विरोधकांना का वाटली नाही असा सवालहि म्हात्रे यांनी यावेळी केला .