#DarkDaysOfEmergency म्हणत काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीवर हल्लाबोल

#DarkDaysOfEmergency म्हणत काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीवर हल्लाबोल

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून २५ जून हा दिवस प्रसिद्ध आहे. १९७५ साली याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. तेव्हा या आणीबाणी विरोधात अनेक नेत्यांनी संघर्ष केला असून त्यातल्या अनेकांनी आपल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २५ जून रोजी ट्विट करत आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्वांचे स्मरण केले आहे. आणीबाणीच्या काळ्या कालखंडाचा कधीच विसर पडू शकत नाही. १९७५ ते १९७७ हा कालखंड संस्थांच्या पद्धतशीरपणे करण्यात आलेल्या विनाशाचा साक्षीदार आहे. आपण साऱ्यांनी अशी शपथ घेऊया की आपण भारतीय लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी आणि आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी कटीबद्ध राहू.

तर याचवेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. “कॉंग्रेसने अशा प्रकारे लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण केले अशा सर्व थोरांचे आपण स्मरण करू” असे म्हणत मोदींनी एका इंस्टग्राम पोस्टची लिंक शेअर केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई-ठाण्यातल्या बनावट लसीकरणाचा पर्दाफाश

शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना

स्पुतनिक वी लस पुण्यात दाखल

अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

तर केंद्रीय गृहमंत्री महित शहा यांनीदेखील आणीबाणीवर तोफ डागली आहे. आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक कला अध्याय आहे जेव्हा एका कुटुंबाच्या विरोधात उठणारे आवाज हे दाबून टाकले गेले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीदेखील आणीबाणीवर निशाणा साधताना त्याला भारताच्या महान लोकशाही परंपरेवरचा काळा डाग म्हटले आहे. काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी आणीबाणीची घोषणा केली असेदेखील ते म्हणाले.

तर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आणीबाणीच्या विरोधात एक व्हिडीओ ट्विटरवर टाकला आहे. ‘लोकशाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा मुकाबला केला!’ असे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version