शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम सुपे यांना अटक झाली आहे. सुपे यांच्या अटकेने राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. तर यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय वाटत आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा ‘बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’ आहे’ असे म्हणत भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. कालपासून सुपे यांची पोलिसांमार्फत चौकशी सुरु होती. अखेर शुक्रवारी त्याच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक
‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा
‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे
शिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी
यावरून ठाकरे सरकारच्या विरोधात टिकेची झोड उठलेली दिसत आहे. मुंबई भाजपाचे प्रभारी असलेले भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले आहे. टक्केवारी दिली की आपण सुटणार याचा विश्वास असल्याशिवाय अधिकारी असे धाडस करणारच नाहीत असे ट्विट करत अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर चपराक लगावली आहे.
पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे.
बेस्ट मुख्यमंत्री आणि त्यांचा हा घरातून चालवलेला बेस्ट कारभार.
टक्केवारी दिली की आपण सुटणार हा ठाम विश्वास असल्याशिवाय हे अधिकारी असले धाडस करणारच नाहीत. pic.twitter.com/vYOUaHgMMy— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2021
ठाकरे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील भरती परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळत आहे. एमपीएससी, आरोग्य भरतीच्या परीक्षांच्या पाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेतही गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. तर त्यानंतर या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचेही समोर आले.