भाजपा नेते सुनील यादव कालवश

भाजपा नेते सुनील यादव कालवश

मुंबईतील अंधेरी भागातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील यादव यांचे निधन झाले आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. कोविड पश्चात उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांचे निधन झाले आहे. सुनील यादव हे अंधेरी पूर्व भागाचे प्रतिनिधित्व करताना महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

सुनील यादव यांच्यावर बालपणापासूनच समाजसेवा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांची वैचारिक जडणघडण झाली. बालपणापासून संघ स्वयंसेवक असलेले यादव हे अंधेरीतील एक लोकप्रिय जननेते प्रसिद्ध होते. १९९२ साली अयोध्या येथे झालेल्या कारसेवेमध्ये सुनील यादव सहभागी झाले होते. तर नंतर दंगलींच्या आरोपात त्यांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

 

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी

सुनील यादव हे राजकारणात सक्रिय होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या. ते आणि त्यांच्या पत्नी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक राहिले आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत यादव हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार होते. पण त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

सुनील यादव यांच्या निधनामुळे समाजात शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या जाण्याने एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version