25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

Google News Follow

Related

ज्वलंत हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही महाराष्ट्रात हिंदूंवरच अन्याय होताना दिसत आहे. रविवारी कल्याणच्या मलंगगड मंदिरातील आरती कट्टरपंथीयांनी बंद पाडली. महाराष्ट्रभर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी माघ पौर्णिमेला होणारी मलंगगड यात्रा रद्द करण्यात आली. मात्र तरीही धार्मिक विधी करायला परवानगी देण्यात आली. यावेळी नियमाप्रमाणे शासकीय अधिकारी, मानकरी आणि ५० भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

हे ही वाचा:

शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची

पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस

ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ

दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात

त्यानंतर आरती करण्यासाठी मात्र केवळ सात भाविकांनाच मंदिरात परवनागी देण्यात आली होती. ही आरती सुरू झाल्यानंतर पाच मिनिटातच ५० ते ६० धर्मांध मुस्लिमांनी या आरतीत गोंधळ करायला सुरूवात केली. त्यांनतर अल्ला हूँ अकबरच्या घोषणा देत त्यांनी हिंदू भाविकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती.

यावरूनच भाजपा नेते सुनील देवधर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत देवधरांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. “मलंगगडावर होणारी मच्छिन्द्र नाथांची आरती बंद पाडण्याची कट्टरतावाद्यांची हिम्मत होते कारण राज्यात कणा नसलेले ठाकरे सरकार सत्तेवर आहे. इटालियन मातोश्रींना मुजरा करणाऱ्या ‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे.” असे सुनील देवधरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा