भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यामध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
सोनाली फोगाट या त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसह गोवा येथे गेल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा २९ हजार मतांनी पराभव झाला होता.
हे ही वाचा:
जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?
डान्सर सपना चौधरीला होणार अटक?
सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू
राकेश झुनझुनवाला ट्रस्टची जबाबदारी ‘या’ व्यक्तीच्या खांद्यावर
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. टिक टॉकवर त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखलं जायचं. बिग बॉसच्या १४ व्या पर्वात त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, त्यांना गोव्यात असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.