कोण म्हणाले, शरद पवारांना खोटे बोलण्याची सवय?

कोण म्हणाले, शरद पवारांना खोटे बोलण्याची सवय?

एखाद्या ज्वलंत विषयात काहीतरी नवी काडी टाकून चर्चेला नवे वळण देण्याची ‘पवारनीती’ महाराष्ट्राला नवीन नाही. शरद पवारांच्या याच कलेचा पुन्हा एकदा प्रत्यय महाराष्ट्राला आला आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणाऱ्यांमागे सत्ताधारी पक्षातील काही घटक असल्याची नवी काडी पवारांनी टाकली आहे. तर यावर ‘शरद पवारांना खोटं बोलायची जुनी सवय आहे’ असा टोला भारतीय जनता पक्षाकडून लगवण्यात आला आहे.

सोलापूरच्या किंग बेरी द्राक्ष वाणाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी शरद पवार बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा विषय काढला. “शेतकरी आपल्या घामाचा मोबदला मागत आहेत. सरकारने किंमतीच्या बाबतीत योग्य प्रकारे धोरण ठरवावे असे त्यांचे म्हणणे आहे. आम्हाला काहीही फुकट नको पण आमच्या घामाची योग्य ती किंमत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे” असे पवार म्हणाले. याच भाषणात ते पुढे म्हणाले की “गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते. गडबड करून शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारा वेगळा वर्ग होता आणि त्यांच्या मागे सत्ताधारी पक्षातील काही घटक होते अशी तक्रार आमच्या कानावर आली.”

हे ही पहा:

राणे-राऊतांच्या वादामुळे कणकवलीत वातावरण तापले

शरद पवारांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “शरद पवारांनी आयुष्यभर खोटेपणाचं केला आणि त्याचीच आता सवय झाली आहे” असे म्हणत आमदार अतुल भातखळकरांनी ट्विट केले आहे.

Exit mobile version