एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिर आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. ओवैसी हे राम मंदिराच्या अभिषेकाला जातीयतेचा रंग देत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. तर, ‘हिंदू धर्म कोणाच्या भक्तिभावनेवर टिप्पणी करत नाही. मात्र प्रभू रामाच्या जन्मस्थळावरील राम मंदिर उद्ध्वस्त करणे आणि मशिद बनणे उचित होते का?,’ असा प्रश्न भाजपचे वरिष्ठ नेते ओम माथुर यांनी विचारला आहे. खूप पूर्वी हिंदू धर्मांच्या भक्तीभावनेला लक्ष्य करण्यात आले आहे, हळूहळू यावरही चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतातील हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एकच आहे’, असे सांगत भविष्यात कोणीही हल्लेखोर आता राम मंदिराला धक्का लावू शकणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी हिंदू तरुणांना केले.
हे ही वाचा:
बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!
महाराष्ट्रातील इसिस दहशतवादी मॉड्यूल: दहशतवाद्यांसाठी ‘पडघा’ म्हणजे ग्रेटर सीरिया
सीएएची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच!
’२२ जानेवारी रोजी मातीचे पाच दिवे प्रज्ज्वलित करा आणि संकल्प करा की, कोणीही गझनी, बाबर वा औरंगजेबाने वाईट नजरेने राममंदिराकडे पाहिले तर, त्याला महाराणा प्रतापाप्रमाणे उत्तर देऊ, असा संकल्प करा,’ असे ते म्हणाले. तर, ओवैसी हे देशातील नागरिकांना भडकवत आहेत. ते सांगत आहेत, मशिदी जात आहेत. मात्र प्रभू रामच देशाची ओळख आहेत. देशात कोणीच बाबरचे वारस नाहीत. आपला डीएनए एक आहे. आपले पूर्वज एक होते. लोक केवळ धर्मांतर करू शकतात,’ असे ते म्हणाले.