पुलवाम्यात भाजपा नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडालीय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजपा नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भाजपा नेते राकेश पंडिता यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले. राकेश पंडिता यांच्यावर त्याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात राकेश पंडिता गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे.
“काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या राकेश पंडिता या नेत्यावर दहशतवाद्यांनी भ्याड गोळीबार करत त्यांची हत्या केली. नि:शस्त्र कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या भेकड दहशतवाद्यांचा तीव्र निषेध.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.
काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या राकेश पंडिता या नेत्यावर दहशतवाद्यांनी भ्याड गोळीबार करत त्यांची हत्या केली. नि:शस्त्र कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या भेकड दहशतवाद्यांचा तीव्र निषेध. pic.twitter.com/v9XBCyVrXR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 3, 2021
राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे घटनेची माहिती दिलीय. पोलिसांनी ट्विट केले की, “दहशतवाद्यांनी त्रालमध्ये नगरसेवक राकेश पंडिता यांना गोळ्या घालून ठार केले. श्रीनगरमध्ये २ पीएसओ आणि सुरक्षित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही राकेश पंडिता पीएसओविना त्रालला गेले होते. त्या परिसराला आता घेराव घातला गेला असून, पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केलीय. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी त्राल नगरपालिकेचे नगरसेवक राकेश पंडिता सोमनाथ यांना तीन अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’
‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही
कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ, तर मृतांच्या संख्येत घट
ही भयानक घटना घडवून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राकेश पंडिताला उचलून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.