दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीतील गाझीपूर भागात बुधवार, २० एप्रिल रोजी एका भाजपा नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
जितु चौधरी (४२) असे या मृत नेत्याचे नाव असून, ते भाजपाच्या मयूर विहार जिल्हा युनिटचे सचिव होते. जितू चौधरी हे मयूर विहार फेज ३ मधील सी-2 येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घराबाहेरच त्यांची हत्या करण्यात आली आहे.हल्लेखोरांनी कटाची योजना आधीच करून ठेवली होती, जसे जितु घराच्या बाहेर आले त्यांनतर त्यांच्यवर घराबाहेरच गोळ्या झाडण्यात आल्या. गुन्हा करून लगेच गुन्हेगारांनी तिथून पळ काढला. स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. गाझीपूर पोलिस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. पोलीस तिथे पोहोचले असता एक व्यक्ती त्याच्या घरासमोरील रस्त्यावर रक्तानी माखलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर जितुंना मेट्रो रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना मृत घोषित केले. जितु यांना चार ते पाच गोळ्या लागल्या होत्या असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख
लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद, मंदिर कायदेशीर आहे का हे तपासणार?
सोशल मिडियावर ‘हे’ केलेत तर कुठल्याही क्षणी येईल नोटीस!
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी रघुनाथ कुचिकचा पीडितेवर दबाव
जितु हे भाजपाच्या युनिटचे सचिव होते आणि त्यांचा स्वतःचा बांधकामाचा व्यवसाय देखील होता. अचानक भाजपा नेत्यावर झालेय या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून, हत्येच्या कारणाचा अधिक तपास करत आहेत.