महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दलवाई यांनी योगी आदित्यनाथ यांनी भगव्या कपड्यात फिरण्यापेक्षा आधुनिक व्हायला हवे, असे हुसेन दलवाई म्हणाले होते. या विधानावर भाजपचे नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस नेते आणि त्यांच्या पक्ष हिंदू धर्माच्या भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का आहे? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. आपल्या ध्वजाचा रंग आणि आपल्या ऋषी-मुनींचा पोशाख हे केवळ त्याग, त्याग, सेवा, ज्ञान, पवित्रता आणि अध्यात्म यांचे प्रतीक असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी आदित्यनाथ मुंबईमध्ये रोडशो करणार आहेत. धर्माच्या गोष्टी करणे ऐवजी आणि भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉडर्न व्हा आधुनिक व्हा उद्योग हे आधुनिकतेचे असतात आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील अशी टीका हुसेन दलवाई यांनी केली होती. राम कदम यांनी ट्विट करून या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांचे हे विधान देशभरातल्या साधू संतांच्या वस्त्रांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. निवडणुका आल्या की याना हिंदू धर्म आठवतो आणि निवडणुका संपल्या की यांचा हिंदूविरोध असा समोर येतो अशी तिखट टीका राम कदम यांनी केली आहे.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!
सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार
रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”
हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसला घेरले आहे. हा योगायोग नसून व्होट बँकेचा प्रयोग आणि उद्योग आहे. हिंदू दहशतवादामुळे काँग्रेसने आता भगवा हल्ला करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचा राष्ट्रध्वजातील भगव्या रंगालाही विरोध आहे का, असा सवाल शहजाद यांनी विचारला आहे. हुसेन दलवाई यांच्यावर काँग्रेस नेतृत्व कारवाई करणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.