भारतीय जनता पार्टीचे नेते आर. एन. सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मूळ गावी म्हणजेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा एक महत्त्वाचा उत्तर भारतीय चेहरा अशी त्यांची ओळख होती.
रविवार दोन जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आर. एन. सिंह यांना देवाज्ञा झाली. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. आर. एन. सिंह हे १ जानेवारी रोजी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी गेले होते.
हे ही वाचा:
जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी
फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले
देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू
अंतिम दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर करोडो रुपयांचा परतावा
८ जुलै २०१६ मध्ये ते भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते. तर यावर्षी म्हणजेच ७जुलै २०२२ रोजी त्यांचा कार्यकाळ संपला होता. मुंबईतील काही सर्वात जुन्या संघटनांपैकी एक असलेल्या उत्तर भारतीय संघाचे ते अध्यक्ष होते. विशेष म्हणजे सातव्यांदा ते या अध्यक्षपदावर निवडून आले होते. त्यांच्या निधनाने समाजातून खूप मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे.