गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेमडेसिवीर निर्यात करणाऱ्या एका कंपनीला फक्त गुजरात सरकारला रेमडेसिवीर पुरवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा कांगावा नवाब मालिकांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. त्यांच्या या दाव्याला प्रवीण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रवीण दरेकरांनी महाराष्ट्र सरकारचे पत्र ट्विट करत सरकारची पोलखोल केली आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात पुरते अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर या सगळ्याचाच तुटवडा आहे. अशा परिस्थिती ठाकरे सरकारमधलील मंत्री आणि नेते आल्या दिवशी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडून शिमगा करत असतात. पण अखेर सत्य समोर आल्यावर त्यांना तोंडावर पडायचीच वेळ येते.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

कोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा

… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!

शनिवारी नवाब मलिक यांनी एक पत्र आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट करत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचे ट्विट केले. यावेळी रेमडेसिवीर निर्यात करणाऱ्या एका कंपनीला फक्त गुजरात सरकारला रेमडेसिवीर पुरवण्यास मान्यता देण्यात आल्याचे म्हटले आहे.

मलिकांच्या याच ट्विटला प्रवीण दरेकरांनी लक्ष्य केले आहे. गुजरातचे पत्र दाखवता मग महाराष्ट्राचे का लपवता? असा सवाल करताना महाराष्ट्र सरकारचे एक पत्र दरेकरांनी ट्विट केले आहे. या पत्रात गुजरात सरकार प्रमाणेच महाराष्ट्रालाही परवानगी मिळाल्याचे दिसत आहे. हे पत्र पोस्ट करून दरेकरांनी ठाकरे सरकारची पोलखोल तर केलीच, पण सोबतच “रोज मोदींच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राज्यातील सामान्य जनतेच्या जीवाची पर्वा करा” अशा तिखट शब्दात कान उघाडणीही केली आहे.

 

Exit mobile version