३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

मुंबई महानगरपालिकेच्या तीन हजार कोटीच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी मुलांच्या भवितव्यासाठी एकही रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यांनी मराठी माणसाच्या नावावर आयुष्यभर राजकारण केले त्यांना शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी एखादे तरी विशेष पॅकेज जाहीर करावे असे वाटले नाही यावरून त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य सीए प्रतिक कर्पे यांनी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र असलेल्या खासगी मराठी शाळा गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. निधीची तरतूद होऊनही त्यांना अनुदान दिले नसल्याने या शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. या शाळांना वाचविण्यासाठी मुंबई मनपाने आपला अनुदान हिस्सा तातडीने देऊन अनुदान सुरू करावे अशीही मागणी वारंवार करण्यात येत आहे. तरीही त्याकडे सत्ताधारी शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे. पालिका मुंबई पब्लिक स्कूलसाठी विशेष योजना राबवत आहे. मात्र, मराठी शाळांसाठी त्यांच्याकडे निधी नाही. गेल्या दहा वर्षात मराठी शाळेतील पटसंख्या १ लाख १३ हजारांवरून ३५ हजारापर्यंत घसरली आहे. ८० ते ९० मराठी शाळा बंद पडल्या आहेत तर २२३ मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही मराठी पाट्या लावण्यावरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नसल्याचा घणाघात प्रतिक कर्पे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर

पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला

नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी

शिक्षण अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद करणार्‍या पालिकेला गेली कित्येक वर्षांत पालक, विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक सेवा सुविधांची माहिती पुरवणारी साधी वेबसाईटही बनवता आलेली नाही. एकूणच २५ वर्षांत मराठी माणसाच्या वाट्याला उपेक्षाच आल्याचे कर्पे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version