भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा एक सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. या फोटोसह पांडा यांनी मिश्कील असे कॅप्शन दिले आहे. “शेवटी एकाचं दिशेने प्रवास करत आहेत” असे कॅप्शन पांडा यांनी दिले आहे. यामुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ते काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. दोन्ही नेते विमानात एकत्र प्रवास करत आहेत. या पोस्टमध्ये पांडा यांनी लिहिले आहे की, “माझ्या मित्राने आणि सहप्रवाशाने मला खोडकर म्हटले कारण त्याने म्हटले की आपण अखेर एकाच दिशेने प्रवास करत आहोत.” शशी थरूर यांनी या पोस्टला उत्तर देत म्हटले आहे की ते फक्त भुवनेश्वरपर्यंतचं सहप्रवासी होते.
My friend & fellow traveler called me mischievous for saying that we seem to be finally travelling in the same direction… pic.twitter.com/JzzpKki1lZ
— Baijayant Jay Panda (@PandaJay) March 21, 2025
भाजपा नेते आणि काँग्रेस नेते यांच्या एकत्र फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक धोरणांची शशी थरूर यांनी अलिकडेच प्रशंसा केली. तसेच थरूर यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत फोटो पोस्ट करत युकेसोबत दीर्घकाळ रखडलेल्या मुक्त व्यापार कराराचे (FTA) पुनरुज्जीवन केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचे कौतुक केले आणि अनेक प्रमुख चिंता दूर करण्यात आल्याचे अधोरेखित केले.
हे ही वाचा :
औरंग्याची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण
नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक
उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार
शिवाय शशी थरूर यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींच्या तटस्थ भूमिकेचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, “मी अजूनही माझ्या चेहऱ्यावरून अंडी पुसत आहे, कारण मी फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताच्या भूमिकेवर टीका केली होती. पण, आज या धोरणाचा अर्थ असा झाला आहे की भारताकडे खरोखर असा पंतप्रधान आहे जो दोन आठवड्यांच्या अंतराने मॉस्कोमध्ये युक्रेनचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती दोघांनाही मिठी मारू शकतो आणि दोन्ही ठिकाणी स्वीकारला जाऊ शकतो. दरम्यान, गेल्या महिन्यात राहुल गांधींनी दिल्लीत खासदार शशी थरूर यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेतली होती. यावेळी शशी थरूर यांच्या बदलत्या भूमिकेवर चर्चा झाल्याचे बोलले जाते.