26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणगांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक त्यांच्या पत्नीवर करत असलेल्या आरोपांवरुन डावखरे आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पलटवार केला आहे.

देशभर गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावींचे नाव घेऊन राज्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. किरण गोसावी हा २०१८ सालच्या एका प्रकरणात फरार असलेला गोसावी हा आर्यन खान प्रकरणात पंच म्हणून समोर आला. किरण गोसावी हा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या पत्नीसोबत एका कंपनीत संचालक आहे असा आरोप मलिक यांनी केला होता.

हे ही वाचा:

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

चीनचे ‘काळे’ कारस्थान; अनेक मासे मृत

त्यानंतर भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या पत्नीसोबत किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे आरोप समाज माध्यमांवर होताना दिसले. यावरूनच ३० ऑक्टोबर रोजी निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

निरंजन डावखरे यांच्या पत्नीसोबत एका कंपनीमध्ये किरण गोसावी नावाचे संचालक आहेत. पण हे किरण गोसावी म्हणजे आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी नसून त्याच नावाची वेगळी व्यक्ती आहे. पत्रकार परिषदेत निरंजन डावखरे यांनी या दुसऱ्या किरण गोसावींना माध्यमांसमोर आणले. यावेळी ‘खोदा पहाड पार निकाल चुहा भी नही’ असे म्हणत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला आहे. तर शेजाऱ्याने दिलेला गांजा फुकून आरोप करताना जरा अभ्यास करावा असा टोलाही डावखरे यांनी लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा