अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर असतात. अशातच आता विरोधी पक्षाकडून अजित पवार यांना लॉलिपॉपची फॅक्टरी टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. एमपीएससीची रिक्त पदे भरण्याच्या मुद्द्यावरून निलेश राणे आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही लॉलीपॉप बनवायची ट्रॅक्टर टाका! शोभेल तुम्हाला’ असे म्हणत राणे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात एमपीएससी भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. स्वप्नील लोणकर या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण अधिवेशनात एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसेल. ५ जुलैच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळातून अशी घोषणा केली की एमपीएससीमार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ही ३१ जुलै म्हणजेच महिना अखेरपर्यंत भरली जातील.

हे ही वाचा:

राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

‘या’ राजकीय नेत्याचा राजकारणातून सन्यास

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?

पण आज ३१ जुलै तारीख आली तरीही एमपीएससी मार्फत भरण्यात येणारी पदे भरण्यात आलेली नाहीत. यावरूनच ठाकरे सरकारवर सवाल उचलले जात आहेत. भाजपाचे महाराष्ट्र सचिव माजी खासदार निलेश राणे हेदेखील याच मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधिमंडळातील भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर टाकत निलेश राणेंनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ‘एमपीएससी मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. आज ३१ जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला.’ असा हल्लबोल राणे यांनी केला आहे.

Exit mobile version