केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाचे सचिव रंजीत श्रीनिवासन यांची अलप्पुझा येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. यापूर्वी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) एका नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी रंजीत श्रीनिवासन यांच्यावरील झालेल्या हल्ल्यासाठी एसडीपीआयची मूळ संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) आरोप केला आहे. सुरेंद्रन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, हा केरळ आपल्याला १९९०च्या दशकातील काश्मीरची आठवण करून देतो. इस्लामिक दहशतवादी संघटना राज्यातील हिंदू राष्ट्रवादी शक्तींच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. सरकार पीएफआय दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ट्विट करून लिहिले आहे की, “तुम्ही फोटोमध्ये पाहत असलेला हा हसणारा माणूस आता हसत नाहीये. त्यांना केरळमध्ये आज सकाळी गुंडांनी मारून टाकले. ते भाजप ओबीसी आघाडीचे सचिव रंजीत श्रीनिवासन आहेत.”

हे ही वाचा:

२५० कुत्र्यांच्या पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?

‘विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो’

धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज

‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव शान केएस यांचाही शनिवारी खून करण्यात आला होता. ३८ वर्षीय नेत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

Exit mobile version