भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई येथील प्रसिद्ध व्यावसायिक मोहित कंबोज यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला नवाब मलिक यांच्यापासून धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले गेले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई येथील सांताक्रूझ पोलीस स्थानकात मोहित कंबोज यांनी ही लिखित तक्रार दाखल केली आहे. मी या देशाचा एक कायद्याचे काटेकोर पालन करणारा नागरिक असून, मुंबईतील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मला धमकी दिली आहे असे कंबोज यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय वाहिनीवरून आपल्याला धमकी दिल्याचे कंबोज यांचे म्हणणे आहे. आपले तुकडे तुकडे करून फेकून देण्याची धमकी नवाब मलिक यांनी दिल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केले आहेत. या आपल्या तक्रारीत कंबोज यांनी गेल्या महिन्याभरातील सर्व घटनांचा उल्लेख केला असल्याचे म्हटले आहे.
Have lodged A Written Complain To Mumbai Police Against Minister Nawab Malik For Criminal Intimidation And Threats To The Life of Myself and My Family !
All Incidents From Last One Month is Mentioned and A Copy is Send to Mumbai Police Commissioner Too With All Proofs ! pic.twitter.com/3BnpoILOs8— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 30, 2021
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी झाले शिवतांडव स्तोत्रात तल्लीन
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे सुरवातीपासूनच आक्रमक झाले असून त्यांनी एनसीबी आणि भाजपा विरोधात मोर्चा उघडला आहे. सुरवातीपासूनच नवाब मलिक हे पत्रकार परिषदा घेत आरोपांच्या फैरी झाडताना दिसले. यात त्यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याशी संबंधित एक व्यक्ती सहभागी असल्याचा दावा केला होता. यानंतर मलिक विरुद्ध कंबोज हा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.