पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच; मिथुन घोषला मारले

पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच; मिथुन घोषला मारले

बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता मिथुन घोष यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. भाजपने या कृत्यासाठी थेट तृणमूल काँग्रेसला दोष दिला आहे. घोष यांची हत्या त्यांच्या राजग्राम येथील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली. भाजपचे म्हणणे आहे की, टीएमसीच्या अराजक पसरवणाऱ्यांनी ही घटना घडवली आहे. आरोपानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने हे आरोप फेटाळले आहेत.

या घटनेवरून राज्य विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही टीएमसीवर टीकास्त्र सोडले आहे. ‘भाजप युवा मोर्चाचे नेते मिथुन घोष यांची इटाहारमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे टीएमसीचे काम आहे,’ असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

रविवारी (१७ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास मिथुन घोष राजग्राम गावातील त्यांच्या घराबाहेर आले असता ही घटना घडली. दोन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना अगदी जवळून गोळ्या घातल्या. पोटात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घोष यांच्या हत्येमुळे राज्याचे राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले आहे. भाजपचे उत्तर दिनाजपूरचे जिल्हाध्यक्ष बासुदेव सरकार म्हणाले की, ‘मिथुन घोष जिल्हा पक्षाच्या युवा शाखेचे सचिव होते. त्यांचे घर इटाहार विधानसभेच्या राजग्राम गावात होते. यापूर्वीही त्यांना अनेक वेळा फोनवर धमक्या आल्या होत्या. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही.’

हे ही वाचा:

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

‘भाजपाचे सरकार खड्यासारखे दूर करा, हे चार खासदार असलेले पवारच सांगू शकतात’

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

सरकार म्हणाले की, ‘आम्हाला रात्री ११.३० च्या सुमारास मिथुन घोष यांच्या हत्येची बातमी समजली. कोणीतरी त्यांना आवाज देऊन घराबाहेर बोलावले आणि जेव्हा ते घराबाहेर आले तेव्हा त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. आम्हाला खात्री आहे की, टीएमसीच्या गुंडांनी ही घटना घडवली आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. आम्ही या प्रकरणी एफआयआर दाखल करू आणि पोलिसांकडून कारवाईची वाट पाहू. आम्हाला या प्रकरणाची निष्पक्ष चाचणी हवी आहे.’

Exit mobile version