25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणनाना पटोले,' त्या ' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध कर

नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध कर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच अडचणीत सापडले आहे नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाला असून नाना पटोले वर कारवाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे या सर्व प्रकरणात‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा नाना पटोले यांनी केला असला तरीही तो धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले आहे.

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. अशी चपराक भांडारी यांनी लगावली आहे तर ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे असेही माधव भंडारी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये भगवंत मान ठरले ‘आप’ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

पटोलेंना अटक करायची सोडून आम्हाला कसली अटक करता!

पटोलेंच्या गावात मोदी नावाचा गुंडच नाही!

कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील श्री. भांडारी ह्यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा