‘भावेश भिंडेकडून ‘मातोश्री’ला किती मलिदा मिळाला? एसआयटी चौकशी करा’

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले घणाघाती आरोप

‘भावेश भिंडेकडून ‘मातोश्री’ला किती मलिदा मिळाला? एसआयटी चौकशी करा’

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या अपघातात होर्डिंगची कंपनी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला उद्धव ठाकरे यांचाच वरदहस्त होता आणि तो या होर्डिंग्सच्या जोरावर १०० कोटी रुपयांची कमाई करत होता. त्यातील किती हिस्सा हा मातोश्रीवर जात होता, असा घणाघाती सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकाराची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या यांनी यासंदर्भात विशेष तपास समितीची अर्थात एसआयटीची स्थापना करून चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणाची पोलखोल केली आहे. ते म्हणाले की, एक होर्डिंग १२० फूट असून त्यासाठी महिन्याचे भाडे ५० लाख आहे. इगो मीडियात हे पैसे जमा झालेत. एका साईटवर चार होर्डिंग आहेत.म्हणजेच २ कोटी रुपये भावेश भिंडेला मिळतात. अशा चार साईट त्याला दिल्या होत्या. म्हणजेच ८ कोटी महिन्याचे मिळत होते. १०० कोटी वर्षाचे त्याला मिळत होते. या पैशातून रेल्वेला राज्य सरकारला शून्य पैसे मिळत होते. पोलिस कल्याण निधीत तर फक्त सव्वादोन कोटी देतात. उरलेले ९८ कोटी रुपये भावेश भिंडे व पेट्रोल पंप कंपनीला जातात त्यातले मातोश्रीला किती जातात. जे लोक भावेश भिंडेला ठाकरेंकडे घेऊन जात होते, त्यांच्याकडे यातला किती हिस्सा जात होता. याचा तपास ईडी, आयकर खाते आणि गृहमंत्री यांनी करावा अशी मागणी करत आहे.

सोमय्या यांनी आदित्य ठाकरेंना विचारणा केली की, आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. ठाकरेंनी हे उत्तर द्यावं की ही होर्डिंग लावलेली जागा पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनची जागा आहे. तिथे १२ होर्डिंग लावण्यात आले आहेत. उद्धव यांनी ही परवानगी दिली आहे. ते मुख्यमंत्री असताना ३० जानेवारी २०२०ला महाराष्ट्र पोलिसांना सांगितले की, हे महाराष्ट्र पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनची जागा आहे, तिथे पेट्रोल पंपची परवानगी घ्या आणि उद्धव ठाकरे यांचे मित्र लॉर्डस मॅक्स सर्व्हिसेसला चालवायला द्या. उद्धव ठाकरेंनी जानेवारी २०२०मध्ये महाराष्ट्र पोलिस महासंचलाकांना सांगितले १६ होर्डिंग लावण्याचे अधिकार भावेश भिंडे इगो मीडियाला द्या. मग आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना काय सजा करणार. नकली सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगणार का?

हे ही वाचा:

शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!

होर्डिंगचा करार १० वरून ३० वर्षांचा केला

सोमय्यांनी एक पत्र दाखवत म्हटले की, या पत्रात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे काय काय करू शकतात हे दिसते. लोहमार्ग पोलिस राज्य सरकारच्या ताब्यात येते. या जागेवर २१ जानेवारी २०२१ रोजी निविदा काढण्यात आली. बीपीसीएल पेट्रोल पंपवर चार होर्डिंग. बाजुला १२ होर्डिंग अशी १६ होर्डिंग लावण्यात आली आहेत. या १२ होर्डिंगची प्रक्रिया सुरू झाली. त्याची ऑर्डर इगो मीडियाला देण्यात आली. कैसर खलिद, लोहमार्ग पोलिस आयुक्त यांनी यात लिहिले आहे की, २०२१च्या निविदेप्रमाणे इगो मीडियाला १० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर कंत्राट देण्यात येत आहे. इगो मीडियाने सांगितले की, आरसीसी फाऊंडेशन टाकले आहे. ते पाहता ३० वर्षांची करा. खलिद यांनी ही ३० वर्षांची मुदत केली.

सोमय्या म्हणाले की, ज्यावेळी मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पोलिस हाऊसिंग वेल्फेअरची जागा आहे. सरकारची जागा असल्यामुळे ४० फुटाचेच होर्डिंग लावता येते. त्यावर खलिदने उत्तर दिले की, ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे. च्यांनी जाणूनबुजून खोटे बोलले आणि त्यांनी महापालिकेला पत्र लिहिले की, ही जागा रेल्वे मंत्रालयाची आहे. महापालिकेचे नियम लागू होत नाहीत.

पालिकेने उत्तर दिले की, हे चुकीचे आहे ही जागा राज्य सरकारची आहे. तिथे जे होर्डिंग लावले त्याचा आकार होता १४० बाय १२० फूट. आसपासच्या १२ होर्डिंग इगो मीडियाची आहेत. ती १४० बाय १२० फुटाची आहेत. मनोज रामकृष्ण यांनी या होर्डिंगसाठी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले त्यांची अटक व्हावी. कारण या घटनेत १६ मृत्यू झालेत जवळपास ६० लोक जखमी झालेत. त्या होर्डिंगला २ फूट पण प्लिन्थ नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली की, या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास व्हावा हा तपास पूर्ण होईपर्यंत खलिद यांना रजेवर पाठविण्यात यावे. जे तेव्हाचे अधिकारी होते त्यांनाही सुट्टीवर पाठवण्यात यावे. हे मोठे कारस्थान आहे, असेही सोमय्या म्हणाले.

Exit mobile version