सोमय्या म्हणतात, शिंदेंनी मला हातोडा दिलेला आहे

दापोलीत सोमय्या झाले दाखल

सोमय्या म्हणतात, शिंदेंनी मला हातोडा दिलेला आहे

माजी मंत्री अनिल परब यांच्या दापाेलीतील साई रिसाॅर्ट प्रकरणावर भाजप नेते किरिट साेमय्या यांनी अनेकदा गंभीर आराेप केले आहेत. आता तर साेमय्या थेट हाताेडा आणि फावड्याच्या प्रतिकृती घेऊन शनिवारी दापाेलीत पाेहोचले. साेमय्या यांनी साई रिसाॅर्ट प्रकरणावरून अनेक गंभीर आराेप केले आहेत. हा रिसाॅर्ट आता लवकरच इतिहास जमा हाेणार, असे ते म्हणत आहेत. एखाद्या लहान व्यक्तीनं काही अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर हाताेडा मारला जाताे, असं म्हणत साेमय्या यांनी आक्रमक होत आपल्या हातातील हाताेडा उगारून दाखवला.

रत्नागिरीतल्या दापाेली येथील या रिसाॅर्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आराेपही साेमय्या यांनी केला आहे. शुक्रवारी अस्लम शेख यांच्या मढ येथील अनधिकृत स्टुडियाेवर साेमय्या यांनी धडक मारली हाेती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपला माेर्चा साई रिसाॅर्टकडे वळवत किरिट साेमय्या खेळ रेल्वे स्थानक मार्गे दापाेलीत दाखल झालं . यावेळी वाटेत त्यांचं अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आलं.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

अनिल परब यांचे साई रिसाॅर्ट ही १,००० काेटींची मालमत्ता आहे. या रिसाॅर्टमध्ये एक दिवस राहण्याचं भाडे ३५ हजार आहे. ही जागा त्यांनी विभा साठे यांच्याकडून घेतली व नंतर सदा परब यांनी हा रिसाॅर्ट अनिल परब यांच्याकडून विकत घेतला. एखाद्या लहान व्यक्तीनं काही अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर हाताेडा मारला जाताे. आता हे रिसाॅर्ट इतिहासजमा हाेणार असं साेमय्या यावेळी म्हणाले.

रिसाॅर्ट ताेडण्याचे आदेश

साेमय्या यांनी साई रिसाॅर्टबद्दल यापूर्वीही अनेक आराेप केले आहेत. साई रिसाॅर्टनं सीआर झेड कायद्याचं उल्लंघन केलं आहे. पर्यावरण खात्याच्या पाच जणांच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये पर्यावरण संस्था व महाराष्ट्र काेस्टल झाेनचे अधिकारी हाेते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांच्या रिसाॅर्टची फाईल मागवली असून हा रिसाॅर्ट ताेडण्याचे आदेश दिलेले असल्याचेही साेमय्या यावेळी म्हणाले.

Exit mobile version