भाजपा नेत्याची ‘इथे’ करण्यात आली हत्या

भाजपा नेत्याची ‘इथे’ करण्यात आली हत्या

काश्मीरच्या कुलगाममध्ये भाजपा नेत्याची हत्या करतण्यात आली आहे. काही अतिरेक्यांनी ही हत्या केली आहे. या घटनेनंतर कुलगाममध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि जवानांनी या घटनेनंतर लगेचच सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

जावेद अहमद डार असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. ते होमशालिबाग मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष होते. डार हे ब्राजलू येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरीच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. संध्याकाळी ४:३० वाजता ही घटना घडली. अतिरेक्यांनी अत्यंत जवळून डार यांना गोळ्या घातल्या. त्यामुळे डार जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यामुळे त्यांनी लगेचच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात घेराबंदी केली आहे. तसेच जवान आणि पोलिसांनी एकत्रित मिळून सर्च ऑपरेशन सुरू केलं असून अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. कुलगाममधून एक दु:खद बातमी आली आहे. जावेद अहमदची हत्या करण्यात आली आहे. मी या हत्येचा निर्भयपणे निषेध नोंदवतो. जावेदच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना आहे, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तर, भाजपानेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. भाजपा या हल्ल्याचा निषेध करत आहे. जावेदच्या कुटुंबीयांप्रती पक्षाची संवेदना आहे, असं काश्मीरमधील भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख मंजूर अहमद यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मद्यालय चालू, देवालय बंद

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

अफगाणिस्तानच्या मदतीला भारत गेला धावून

दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्यांना अतिरेक्यांकडून निशाणा केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गुलाम डार हे कुलगाममधील किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. ते सरपंचही होते.

Exit mobile version