31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणकाकांच्या मांडीवरून भगव्याचा अपमान दिसत नसावा

काकांच्या मांडीवरून भगव्याचा अपमान दिसत नसावा

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात घडलेल्या घटनांवरून आणि हिंदुत्वाचा मुद्द्यावरून पडळकरांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. यासंबंधीचा व्हिडिओ पडळकरांनी ट्विटरवर अपलोड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध संजय राऊत असा कलगीतुरा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले पडळकर?
“जनाब संजय राऊत महाराष्ट्रमध्ये औरंगजेबाची स्तुती करणारी पुस्तकं लिहिली जातात आणि त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात. तुमच्या महाराष्ट्रातील सरकारचा कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहितात. पण तुम्हाला कदाचित काकाच्या मांडीवरून उस्मानाबाद मध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या औलादिंचा तांडव दिसत नसावा.

हे ही वाचा:

इस्लाम स्वीकारा, नाहीतर देश सोडा… तालिबानचा शीख समुदायाला इशारा!

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असणारा भगवा लावण्यावरून उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या वरती दगडफेक होते. अशावेळेस एरवी उस्मानाबादचे धाराशिव करतो म्हणणाऱ्यांच्या हाताला लकवा मारतो का? तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल उलट सुलट विधानं करतात. उलट सुलट लिहितात आणि अशावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?

औरंगाबादमध्ये गरोदर महिलेवर अत्याचार होतो. त्यावर तुम्हाला एक ओळही खरडावीशी वाटत नाही का? औरंगाबादचे संभाजीनगर करतो म्हणणाऱ्यांना निजामशाहीची पालखी उचलण्यात आणि वाहण्यातच जास्त आनंद मिळतो.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा